अविनाश जाधव यांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी

ठाणे – कोविड रुग्णालयात सुरक्षा रक्षकांना शिवीगाळ आणि धमकावल्याप्रकरणी मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मात्र, गुरुवारी होणारी सुनावणी आता शुक्रवारी होणार असल्याची माहिती जाधव यांचे वकील ओंकार राजूरकर यांनी दिली.

सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात अविनाश जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी अर्ज केल्यानंतर ठाणे न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला होता.

त्यानंतर मनसेने जिल्हा सत्र न्यायालयात जमीन अर्ज दाखल केला होता. त्यावर गुरुवारी कोर्टात सुनावणी आणि युक्तिवाद होणार होता. मात्र, कापूरबावडी पोलिसांनी न्यायालयात मुसळधार पावसाची सबब पुढे करून रिपोर्ट सादर न केल्याने न्यायालयाने अविनाश जाधव यांची आजची सुनावणी पुढे ढकलली. आता ही सुनावणी आणि युक्तिवाद शुक्रवारी दोन्ही पक्षांच्या न्यायालयात होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.