जिल्ह्यातील 279 रुग्णांना मिळाला आज डिस्चार्ज
नगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यात काल शुक्रवारी (दि.31) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी बारा वाजेपर्यंत रुग्ण संख्येत 535 ने वाढ झाली दरम्यान, आज जिल्ह्यातील 279 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता 3 हजार 639 इतकी झाली आहे.
बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये सिव्हिल हडको एक, निर्मलनगर एक, माळीवाडा एक, पाइपलाइन रोड एक, गुलमोहर रोड एक, कायनेटिक चौक एक, कासारवाडी पंपिग स्टेशन एक, नगर शहर एक, शिवाजीनगर कल्याण रोड एक अशे नऊ रुग्ण अढळून आले आहेत. नेवासा तालुक्यात तरवडी येथे एक, कुकाणा एक, जैनपुर तीन, पाचेगाव एक, नेवासा फाटा दोन, सोनई एक, जामखेड दोन, अशा 24 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे बाधित जिल्ह्यात बाधित रुग्ण संख्या 5 हजार 580 वर गेली आहे.
दरम्यान, आज 279 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये, मनपा 117, संगमनेर 38, राहाता 18, पाथर्डी 14, नगर ग्रामिण 21, श्रीरामपूर पाच, कॅन्टोन्मेंट 23, नेवासा एक, श्रीगोंदा एक, पारनेर 10, अकोले 12, राहुरी सात, शेवगाव चार, कोपरगाव पाच, कर्जत येथील तीन रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.