शिरूर : शिरूर शहरासह तालुक्यातील 15 गावात 22 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून, केंदूर येथील एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी दिली आहे.
शिरूर तालुक्यातील एका दिवशी 15 गावात कोरोनाचे रुग्ण आढळल्याने शिरूर तालुक्याची चिंता वाढवणारा आजचा दिवस आहे. त्यामुळे आता प्रशासनाने शिरूर तालुक्यावर नजर ठेवून कोरोना बाधितांची संख्या घटण्यासाठी योग्य ते उपाय योजना कराव्यात.
शिरूर तालुक्यात आज पर्यंत तालुक्यात 322 तर शिरूर शहरात 78 असे एकूण 400 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून 17 जणांचा मृत्यू झाला आहे. शिरूर तालुक्यात व शहरात गेली दोन दिवसात 84 नागरिकांचे कोरोना तपासणीसाठी नमुने घेण्यात आली होती त्या पैकी शिरूर शहरात दोन तर शिरूर तालुक्यात 20 कोरोना रुग्ण आढळले आहेत.
आज शिरूर शहर व शिरूर तालुक्यातील 47 जणांचे कोरोना तपासणीकरिता नमुने घेतले असून, शिरूर शहरात गुजर मळा येथे ते 36 वर्षीय महिला तर विठ्ठल नगर येथील 50 वर्षीय कंपनी कामगार असे दोघे जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले असल्याची माहिती शिरूर कोविड केअर सेंटर प्रमुख व शिरूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तुषार पाटील यांनी दिली.शिरूर शहरात जरी आज कोरोना बाधित संख्या कमी असली तरी शिरूर शहराजवळील शिरूर ग्रामीण 4 व तर्डोबावाडी 2 असे सहा कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने शिरूर शहराची ची धाकधुक काही कमी होत नाही.
शिरूर तालुक्यातील शिरूर शहर 2, सणसवाडी 1,शिक्रापूर 1,तळेगाव ढमढेरे 1,कोरेगाव भीमा 2,रांजणगाव गणपती 2, वाघाळे 1, मांडवगण फराटा 1, सादलगाव 1, शिरूर ग्रामीण 4, गणेगाव धुमाळ 1, केंदुर 1, तर्दोबावाडी 1, जातेगाव 1, पिंपळे धुमाळ 1, असे 15 गावात 22 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून, केंदूर येथील एकाचा यामध्ये मृत्यू झाला आहे.
यामुळे शिरूर तालुक्यातील एकूण 15 गावात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने शिरूर तालुक्यात खळबळ उडाली असून आता प्रत्येक गावात रुग्ण आढळू लागल्याने प्रशासनापुढे कोरोनाची साखळी तोडण्याचे मोठे आव्हान आता निर्माण झाले आहे.