रांजणगाव गणपती : वाघाळे (ता. शिरुर) येथे एक कोरोनाबाधित रुग्ण सापडला असल्याचे रांजणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिका-यांनी सांगितले.
संबधित इसमाचा एक नातेवाईक मांडवगण फराटा येथून नागपंचमी च्या सणाला वाघाळे येथे आला होता. नागपंचमी झाल्यावर दोन दिवसांनी संबधित नातेवाईकाने ञास झाल्यावर कोरोनाची तपासणी केली असता अहवाल पाँझिटिव्ह आल्यावर वाघाळे येथील नागरिकाने ही आपली कोरोना तपासणी केल्यावर अहवाल पाँझिटिव्ह आला असल्याचे वैद्यकीय अधिका-यांनी सांगितले.
संबधित कोरोनाबाधित इसमावर घरीच उपचार करण्यात येणार असून संर्पकातील व्यक्तीँचे स्वँब तपासणी साठी नेण्यात येणार असल्याचे अधिका-यांनी सांगितले. प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी , शिक्षक, ग्रामसेवक, कामगार तलाठी या सर्वांच्या साहाय्याने गावात सर्वे करण्यात येणार असून नागरिकांनी घाबरुन न जाता व कसलीही अफवा न पसरवता शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन सरपंच अमोल धरणे यांनी केले आहे.