रेडा -उपेक्षित कलाकार, मजूर, कामगारांना अडचणीच्या काळात केलेली मदत कधीही विसरली जात नाही. ही मदत इंदापूर पत्रकार संघाने केली असल्याने पत्रकार संघाचे काम आदर्श आहे, असे गौरवोद्गार राज्यमंत्री दत्तात्रय भरणे काढले.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, इंदापूर तालुका व शहर ग्रामीण मराठी पत्रकार संघ यांच्या विद्यमाने शेटफळ पाटी येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त 250 कलाकारांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे भरणे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष नीळकंठ मोहिते, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष हनुमंतराव कोकाटे पाटील, कार्याध्यक्ष अतुल झगडे, हभप अशोकमहाराज मोहिते, हभप प्रमोदमहाराज शिंदे, वैभवमहाराज निंबाळकर, सागर शिंदे, सोमनाथ ढोले, संदीप सुतार, शिवकुमार गुणवरे, आबासाहेब उगलमुगले, सचिन खुरंगे, गोकुळ टांकसाळे, राजेंद्र भोसले, सागर मिसाळ, सोमनाथ वाघमोडे, स्वप्निल करगळ, सुभाष मोरे, डॉ. शरद पडसळकर उपस्थित होते.