मसूर – पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या प्रयत्नाने कराड उत्तर विधानसभा मतदार संघातील विविध विकास कामांसाठी 2515 ग्रामीण विकास योजनेंतर्गत 4 कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. सदरची कामे लवकरच सुरू होणार आहेत. हा निधी मंजूर होणेकामी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व ग्रामीण विकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे सहकार्य लाभले.
मंजूर कामांमध्ये हजारमाची ता. कराड येथील दक्षिणमुखी श्री हनुमान मंदिर ते उगले वस्तीपर्यंत रस्ता व वार्ड क्र. 1 मध्ये रस्ता कॉंक्रीटीकरण करणे, निगडी अंतर्गत रस्ता खडीकरण-डांबरीकरण, उंब्रज महात्मा गांधी विद्यालय पालखी रोड रस्ता खडीकरण डांबरीकरण, कोर्टी गणेशनगर मधील अंतर्गत रस्ता खडीकरण-डांबरीकरण, यशवंतनगर विठ्ठल रखुमाई मंदिरासमोर सामाजिक सभागृह बांधणे, राजमाची जानाईमाता मंदिराच्या ओढ्याकाठी संरक्षक भिंत बांधणे, बनवडी अंतर्गत रस्ता, मसूर युवराज चौकापासूनचा रस्ता,
पाल लक्ष्मी मंदिराच्या पाठीमागे नदीकाठी संरक्षक भिंत बांधण, गोवारे (पूर्व) गजानन हौसिंग सोसायटी अंतर्गत रस्ता कॉंक्रीटीकरण, कोपर्डे हवेली वॉर्ड क्र. 2, 3 व 4 मधील रस्ता डांबरीकरण, हनुमानवाडी येथे ग्रामपंचायत कार्यालय बांधणे, चरेगाव श्रीराम मंदिरासमोर सामाजिक सभागृह बांधणे, गोवारे रत्नदीप सोसायटी अंतर्गत रस्ते खडीकरण डांबरीकरण, निवडूंगवाडी स्मशानभूमी सुधारणा करणे, अपशिंगे मि. महिलांसाठी शौचालय युनिट बांधणे,
निसराळे अंतर्गत रस्ता खडीकरण-डांबरीकरण, जांभगाव येथे सामाजिक सभागृह बांधणे, गणेशवाडी येथील गणेश मंदिरासमोर सभागृह बांधणे, भैरवगड येथे एस. टी. पिकअप शेड बांधणे, पाडळी-शिंदे मळ्याकडे जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण, नागठाणे चौंडेश्वरी कॉलनी अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण, नागठाणे येथे कातकरी व मातंगवस्ती येथे सभागृह बांधणे आदी कामांचा समावेश आहे.
कोरेगाव तालुक्यात वाठार कि. येथे वार्ड क्र 4 मधील रस्ता डांबरीकरण, नंदिवाले समाजासाठी व्यंकटेश्वर मंदिरासमोर सामाजिक सभागृह बांधणे, नलवडेवाडी जि. प. शाळा येथील रस्ता खडीकरण-डांबरीकरण, कण्हेरखेड ते काटेवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण, वेलंग येथे स्मशानभूमी सुधारणा.
रहिमतपूर सामाजिक सभागृह व बेलेवाडी येथे ग्रामपंचायत कार्यालय बांधणे, नागझरी सामाजिक सभागृह बांधणे, अंभेरी येथे पवार वस्तीकडे जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण, धामणेर येथे ग्रामपंचायत इमारतीवर सामाजिक सभागृह बांधणे.
शेनवडी येथे सामाजिक सभागृह बांधणे, राजाचे कुर्ले येथे ग्रामपंचायत कार्यालय बांधणे, थोरवेवाडी येथे सामाजिक सभागृह बांधणे, पुसेसावळी येथे गुरव सर्व्हिसींग सेंटर ते जोतिबा मळ्याकडे जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण, मुसांडवाडी येथे पिर दर्गा शेजारी सार्वजनिक शौचालय बांधणे, भुषणगड येथे हरणाईमाता मंदिराकडे जाणारा रस्ता सुधारणा करणे आदिंचा समावेश आहे.