नांदुर : दौंडच्या पश्चिम पट्ट्यात सहजपुर – नांदुर औद्योगिक वसाहतीमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे परिसरामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन दिवसापुर्वी औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीमध्ये कोरोना पाॅजिटीव्ह रूग्ण आढळला होता.
आता पुन्हा सहजपुर याठिकाणी आणखी एक कोरोनाबाधित रूग्ण आढळून आल्याने व संबंधित व्यक्ती एका नामांकित कंपनीमध्ये कामाला असल्याने संपर्कातील आणखी रूग्णांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. तसेच बोरीभडक ( ता. दौंड) चंदनाडी या ठिकाणी महीला पाॅजिटीव्ह आल्यामुळे परिसरातील नागरीकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
शासनाने जाहीर केलेल्या पहील्या लाॅकडाऊनपासुन आजपर्यंत औद्योगिक वसाहत असुनही एकही रूग्ण आढळला नव्हता. पण आता रूग्ण आढळत असल्याने कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्याचबरोबर आणखीही रूग्ण वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कंपन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित क्षेञातुन कामगार कामाला येत आहेत. परंतु त्यांच्या सुरक्षेसंदर्भातील उपाययोजनांकडे लक्ष दिले जात नसल्याचे निदर्शनास येते व प्रशासनालाही माहीत दिली जात नाही. त्यामुळे अशा नागरीकांच्या जीवाशी खेळणा-या कंपन्यांवर जिल्हाअधिकारी यांनी कारवाई करावी अशी मागणी या भागातील नागरिक करीत आहे .