मुंबई – मराठी चित्रपटसृष्टीत शंभर कोटींची कमाई करून नवा इतिहास रचणारा चित्रपट म्हणजे ‘सैराट’. नागराज मंजुळे दिग्दर्शित या चित्रपटाने रसिकांना जणू काही याड लावलं आहे. सैराटसह नागराजच्या पिस्तुल्या ही शॉर्टफिल्म आणि फँड्री चित्रपटावरही रसिकांनी भरभरून प्रेम केलं आणि पसंती दिली. एक संवेदनशील दिग्दर्शक अशी नागराजची ओळख बनली आहे.
एकीकडे चित्रपटश्रुष्टीत दिग्दर्शक म्हणून नाव होत असताना नागराजच्या उत्तम शॉर्टफिल्म्सला विसरू देखील चालणार नाही. उत्कृष्ट चित्रपटांसोबतच नागराजने उत्तम शॉर्टफिल्म्सदेखील बनवल्या आहेत. दरम्यान, आता लवकरच त्याच्या न पाहिलेल्या शॉर्टफिल्म्स झी टॉकीजवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
येत्या रविवारी म्हणजेच, दिनांक 19 जुलै रोजी दुपारी 12 आणि संध्याकाळी 7 वाजता ‘नागराजचा पिटारा’ या मध्ये नागराजच्या शॉर्टफिल्म्स पाहता येणार आहे. नागराज यांच्या या पिटाऱ्यात ‘पावसाचा निबंध’, ‘बिबट्या – द लेपर्ड’ आणि ‘पायवाट’ या तीन कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीस येतील.