इस्लामाबाद – पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील दिमार-भाषा धरणाच्या बांधकामाला पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी बुधवारी सुरुवात केली. यामुळे देशामध्ये कमी किमतीत पर्यावरण अनुकूल हायडेल ऊर्जा निर्माण होईल, असे ते म्हणाले.
दिमर भाषा हे तारबेला आणि मंगला धरणानंतर पाकिस्तानातील तिसरे सर्वात मोठे धरण असेल. या प्रकल्पातून 4,500 मेगावॅट स्वस्त दराची वीज निर्मिती होईल आणि किमान 16,000 रोजगार उपलब्ध होतील. हे धरण 2028 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.
या धरणाच्या बांधकामासाठी पाकिस्तान सरकारने मे महिन्यात चीनच्या सरकारी कंपनीबरोबर 442 अब्ज रुपयांचा करार केला आहे. पाकिस्तानने अवैधरितीने बळकावलेल्या भागातील या धरणाच्या कामाच्या कंत्राटाला भारताने तीव्र आक्षेप घेतला आहे.