लाणी काळभोर -पूर्व हवेलीमधील करोनाबाधित रुग्ण व रुग्णांच्या संपर्कात आलेल्या हायरिस्क नातेवाइकांना मागील आठ दिवसांपासून रुग्णालयात बेड उपलब्ध होत नसल्याने वणवण फिरावे लागत होते.
मात्र, खासदार डॉ. अमोल कोल्हे व आमदार अशोक पवार यांनी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवल्याने, आरोग्य विभागाने गुरुवारी (दि. 16) दिवसभरात वाघोली व कदमवाकवस्ती येथे 400 पेक्षा अधिक बेड ताब्यात घेतले आहेत.