शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे यांची माहिती
शिरूर (प्रतिनिधी) : शिरूर शहराजवळील बाबुराव नगर येथील 42 वर्षीय डॉक्टर व बाफना मळा येथील एक 36 वर्षीय कंपनी कामगार कोरोना पॉझिटिव्ह आढळला असल्याची माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी दिली आहे. यामुळे बाबुराव नगर बाफना मळा व शिरूर शहरात खळबळ उडाली आहे.
शिरूर बाफना मळा येथील कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आलेला रुग्ण 36 वर्षीय कामगार असून अहमदनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे तर बाबुराव नगर येथील 42 वर्षीय रुग्ण खाजगी वैद्यकीय व्यवसाय करणारा आहे त्याला घरीच उपचार सुरू करण्यात आले आहे.
शिरूर शहराशेजारील उपनगरात कोरोना पॉझिटिव्ह दोन रुग्ण आढळल्याने व त्यात एका डॉक्टरचा समावेश असल्याने शिरुर शहरातही याबाबत घबराट पसरली आहे. तरी या डॉक्टर व कामगारांचे संपर्कात कोण कोण आलेले आहेत त्यांचा तपास शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे व तर्डोबावाडी,रामलिंग ग्रामपंचायत वतीने सुरू आहे.