मांडवगण फराटा : नागरगाव (ता.शिरूर) येथे लग्नात सहभागी झालेल्या एका ७० वर्षीय महिलेचा करोना अहवाल पॉझिटीव्ह आला असल्याची माहीती निमोणे आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डाॕ.इंदिरा डॕनियल यांनी दिली.शिरूरच्या पुर्व भागात मांडवगण फराटा येथे पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर बाभूळसर बुद्रुक,कुरुळी व आता नागरगाव येथे रुग्ण आढळल्याने करोनाने पुन्हा पुर्व भागात शिरकाव केला आहे.
७० वर्षीय महिला वीस दिवसापुर्वी नातेवाईकाच्या लग्नाला गेली होती.लग्नाहून परत आल्यानंतर सात दिवसापासून सदर महिलेला सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे आढळल्याने त्यांनी विश्वराज हाॕस्पिटल येथे करोना चाचणी केली. यात काल संध्याकाळी हा अहवाल पाॕझिटिव्ह आला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातही करोनाचा शिरकाव आता मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे.
याबाबत माहीती देताना निमोणे आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डाॕ.इंदीरा डॕनियल यांनी सांगितले. करोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात किती व्यक्ती आल्या आहेत याचा शोध सुरु असून त्यांना क्वारटाईन केले जाईल. त्याच बरोबर कंन्टेमेंट झोन निश्चित करून त्या परिसरात औषध फवारणी केली जाईल. नागरिकांनी मास्क व सॕनिटायझरचा वापर करावा. ग्रामपंचायत प्रशासन करोनाची साखळी तोडण्यासाठी सक्रिय झाले असून नागरिकांनी करोनाचा फैलाव होऊ नये म्हणून सुरक्षीत खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. त्याचबरोबर नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन सरपंचा मनिषा शेलार यांनी केले.