हिंजवडी – आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडीसह परिसरात गुरूवारपासून कडकडीत लॉकडाऊन करण्याचा निर्णय स्थानिकांकडून घेण्यात आला आहे. हिंजवडीसह माण, मारुंजी, जांबे, नेरे, या ठिकाणी ही लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. दरम्यान, अत्यावश्यक सेवा आणि आयटी कंपन्यांना यामधून वगळण्यात आले आहे.
लॉकडाउनमधून अत्यावश्यक सेवा, आयटी कंपनी तसेच बांधकाम सुरू असलेल्या साईट्सना वगळण्यात आले आहे, अशी माहिती हिंजवडीच्या सरपंच आरती वाघमारे आणि मारुंजीच्या सरपंच पूनम बुचडे यांनी दिली आहे. पहाटे 6 ते 9 यावेळेत दूध पुरवठा करण्यास परवानगी देण्यात आली आहे.