चिंबळी – केळगाव (ता. खेड) येथे बुधवारी (दि. 8) दोघांना करोनाची लागण झाल्याची माहिती शेलपिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकारी डॉ. इंदिरा पारखी यांनी दिली. केळगावात दोन रुग्ण आढळून आल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.
तर रुग्ण आढळलेल्या परिसरात कंटेन्मेंट झोन घोषित केला आहे. तरी नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरू नये, गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे, मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन पारखी यांनी केले आहे.