मंचर – आंबेगाव-जुन्नर तालुक्यातील मंचर, आळेफाटा, नारायणगांव शहरातील बॅंका, पतसंस्था पूर्ववत दुपारी तीनपर्यंत चालू राहतील, अशी माहिती मंचर विभागाचे प्रांतअधिकारी जितेंद्र डुडी यांनी बुधवारी (दि. 8) दिली.
कन्टेन्मेंट झोन प्रतिबंधित क्षेत्र जेथे जाहीर केले आहे, तेथील बॅंका, पतसंस्था बंद राहतील, असे स्पष्ट करून प्रांतअधिकारी डुडी म्हणाले की, लॉकडाऊनमधील नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता मंचर, आळेफाटा, नारायणगांव शहरातील बॅंका, पतसंस्था दुपारी तीनपर्यंत चालू राहणार आहेत.
नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. अन्यथा गुन्हे दाखल केले जातील, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.