जोहान्सबर्ग – दक्षिण आफ्रिकेचा अव्वल क्रिकेटपटू कॉन्टन डीकॉक याला वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळाला आहे. दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाने देशातील क्रिकेटपटूंसाठी आयोजित केलेल्या ऑनलाईन पुरस्कार वितरण समारंभात ही घोषणा केली.
करोनाचा धोका अद्याप कायम असल्याने हा सोहळा ऑनलाइन पद्धतीने करण्यात आला. या सोहळ्यात मंडळाने अनेक खेळाडूंना विविध पुरस्कार जाहीर केले त्यात महिला संघातीलही काही खेळाडूंचा गौरव करण्यात आला. डीकॉकने यष्टिरक्षक फलंदाज म्हणून गेल्या तीन मोसमांत सरस व सातत्यपूर्ण कामगिरी केल्यामुळेच त्याची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याची माहिती मंडळाने
दिली आहे.