आलिया भट्टचा आगामी “सडक-2′ चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात येणार असल्याचे मुकेश भट्ट यांनी जाहीर केले आहे. यात आलिया भट्ट, आदित्य रॉय कपूर, संजय दत्त आणि पूजा भट्ट आदी स्टार कलाकार असून तो 10 जुलैला प्रदर्शित होणार होता; परंतु बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर सर्वांनाच धक्का बसला. पण त्याच्या निधानानंतर सोशल मीडियावर घराणेशाही हा वाद पेटून उठला आहे.
यातच, अभिनेत्री आलिया भट्टला देखील मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आले. नुकताच आलियाच्या ‘सडक २’ या चित्रपटाचे पोस्ट प्रदर्शित झाले. हे पोस्ट प्रदर्शित केल्याानंतर नेटकऱ्यांच्या टीकेपासून वाचण्यासाठी आलियाने मोठे पाऊल उचलले असल्याचे म्हटले जात आहे.
नुकताच आलियाने एका लाईव्ह चॅटमध्ये ‘सडक २’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित केले आहे. महेश भट्ट यांनी ‘सडक २’ चे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केल्यामुळे त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. आलियाने मात्र ट्रोलर्सपासून वाचण्यासाठी चित्रपटाचे पोस्टर शेअर करत सोशल मीडिया अकाऊंटचे कमेंट बॉक्स चाहत्यांसाठी बंद केल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आता आलिया फॉलो करत असलेले लोकं केवळ तिच्या फोटो आणि व्हिडीओवर कमेंट करु शकतात.