मुंबईसह उपनगरात पावसाची जोरदार हजेरी

मुंबई: मुंबईत आज सकाळपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबई शहर आणि उपनगरात पाऊस पडत आहे. दादर, माटुंगा, वरळी, लालबाग, सायन, कुर्ला, अंधेरीसह अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे हिंदमाता, अंधेरी, कुर्ला, सायन यासह अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे.


मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईत येत्या काही तासात अजून मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घराच्या बाहेर न पाडण्याचे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान सकाळपासून सुरु असलेल्या पावसामुळे रस्त्यांवरील वाहतुकीवर परिणाम झाला असून संथगतीने सुरु आहे. त्याशिवाय मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह अति जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे आणि सोलापुरात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई वेधशाळेनं जिल्हा प्रशासनाला ही माहिती दिली आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.