वाघोली (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल आक्षपार्ह विधान केल्यामुळे वाघोली (ता. हवेली) येथे गुरुवारी (दि. २५) रोजी पुणे-नगर महामार्गावरील श्रीमंत गणेश तरुण मंडळाजवळ भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या पुतळ्याचे दहन करून राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून निषेध करण्यात आला.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून पडळकर यांचे विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. शरद पवार यांच्या कार्याची संपूर्ण महाराष्ट्राला जाण असून त्यांच्याबद्दल पडळकर यांनी अत्यंत चुकीचे वक्तव्य केले आहे, त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने निषेध करण्यात येत असल्याचे महाराष्ट्र राज्य ओबीसी सेलचे संदीप थोरात यांनी सांगितले.
यावेळी महाराष्ट्र राज्य ओबीसी सेलचे संदीप थोरात, माजी उपसरपंच शांताराम कटके, हवेली तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष विनोद सातव, राजेंद्र सातव, सुभाष कोलते, सागर गोडसे, बशीर सय्यद, अबीद शेख, करण थोरात, रणजित अडसूळ, रोहित थोरात, रोहित सातव, भगवान जाधव, तेजस पाटोळे, शुभम गोगावले, सुयश सातव आदि उपस्थित होते.