मुंबई – ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी अपशब्द उच्चारल्याबद्दल भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा राष्टवादी कॉंग्रेस पक्षातर्फे नगरमध्ये निषेध करण्यात आला आहे. यातच शरद पवारांचे नातू आणि आमदार रोहित पवार यांनी पडळकर यांच्यावर टीका केली आहे.
रोहित पवार म्हणाले,’“गोपीचंद पडळकर ज्या पक्षातले आहेत त्या पक्षाचे महाराष्ट्रातील नेते देवेंद्र फडणवीस आहेत. वक्तव्य केल्यानंतर काही वेळानंतर त्यांच्याच नेत्यांनी त्यांना झापलं असं आम्हाला कळालं. गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्या नेत्यांकडून शिकलं पाहिजे. त्यांच्या नेत्यांनी सांगितल्यावर आम्ही काय बोलणार. काही लोक टीव्हीवर येण्यासाठी, बातम्या होण्यासाठी अशी वक्तव्य करत असतात. ओघाच्या नादात आपण काय बोलतोय हे विसरुन जातात. ओघाच्या नादात त्यांच्याकडून चूक झाली असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे”. असं म्हणत त्यांनी भाजप पक्षावर निशाणा साधला आहे.