पुणे : मंडप डेकोरेटरने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील धायरी परिसरात घडली आहे. स्वप्नील उत्तम रायकर(वय 45, धायरी) असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांचा मंडप डेकोरेटरचा व्यवसाय होता. राहत्या घरी त्यांनी छताच्या हुकला बेडशीटच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्वप्नील रायकर याने मानसिक तणावाखाली हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती आहे. स्वप्नील रायकर याचा मंडप डेकोरेटरचा व्यवसाय होता. या घटनेने धायरी परिसरात एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी सिंहगड पोलीस पुढील तपास करत आहेत.