पुणे : चतु:शृंगी विभागाकडून वाहतुकीत बदल

पुणे – मुंबई-बेंगळुरु राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर पाषाण रस्ता येथे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. यामुळे पुढील आदेशापर्यंत प्रायोगिक तत्त्वावर चतु:शृंगी वाहतूक विभागाकडून वाहतुकीत बदल केले आहेत. याबाबत वाहतूक शाखेचे अपर पोलीस आयुक्‍त डॉ. संजय शिंदे यांनी आदेश दिले.

पाषाणकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक सुस पुलाच्या अलीकडे उजवीकडे वळून सर्व्हीस रोडने ननावरे अंडरपासमार्गे वळवण्यात येणार आहे. पाषाणकडून सुस गावाकडे जाणारी वाहतूक पुलाच्या अलीकडे उजवीकडे वळून सर्व्हीस रोडने ननावरे अंडरपासमार्गे सुपिरो ईलाइट सोसायटी ह्युंदाई शोरुममार्गे सुसगावकडे वळवण्यात येणार आहे.

सुस गावकडून सुस ओव्हर ब्रीजमार्गे पाषाणकडे येणारी वाहतूक पुलाच्या अलीकडे डावीकडे वळूक ह्युंदाई मार्गे सुपिरो ईलाइट सोसायटी ननावरे अंडरपास मुंबई बेंगळुरु हायवेलगत सर्व्हीस रस्त्याने पाषाण सुस रस्त्यावर येऊन पाषाणकडे वळवण्यात येणार आहे. पाषाणकडून कात्रजकडे जाणारी वाहतूक पुलाच्या अलीकडे डावीकडे वळून सर्व्हीस रोडने 100 मीटर पुढे जाऊन मुख्य मुंबई बेंगळुरु राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर येऊन कात्रज अथवा साई चौकात डाव्या बाजुला वळून सुतारवाडीमार्गे मुख्य बेंगळुरु राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर येऊन कात्रजकडे वळवण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूक शाखेकडून देण्यात आली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.