कोल्हापूर (प्रतिनिधी) : आज रात्री 8 वाजेपर्यंत 140 प्राप्त अवालापैकी एकही अहवाल पॉझीटिव्ह आला नाही. जिल्ह्यात आजअखेर 725 रूग्णांपैकी 650 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 67 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.
आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे – आजरा- 75, भुदरगड- 71, चंदगड- 75, गडहिंग्लज- 84, गगनबावडा- 6, हातकणंगले- 10, कागल- 57, करवीर- 21, पन्हाळा- 27, राधानगरी- 66, शाहूवाडी- 180, शिरोळ- 7, नगरपरिषद क्षेत्र- 11, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-27 असे एकूण 717 आणि पुणे -1, सोलापूर-3, मुंबई-1, कर्नाटक-2 आणि आंध्रप्रदेश-1 असे इतर जिल्हा व राज्यातील 8 असे मिळून एकूण 725 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.
जिल्ह्यातील एकूण 725 रूग्णांपैकी 650 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 8 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 67 इतकी आहे.