CORONA : ‘डेक्‍सामेथासोन’ रामबाण उपाय ठरल्याचा दावा; वाचा नेमकं काय आहे संशोधन

लंडन – डेक्‍सामेथासोन या स्टिरॉईडच्या कमी प्रमाणातील डोसमुळे करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांपैकी एकतृतीयांश रुग्णांचा मृत्यू टाळण्यात यश मिलाले आहे, असे संशोधकांचे म्हणणे आहे. या स्वस्तातील औषधाचा 2,100 रुग्णांवर केलेल्या वापराचा अभ्यास या संशोधकांकडून केला जातो आहे. रुग्ण बरे होत असताना त्यांच्या प्रकृतीत झालेल्या सुधारणेचा तौलनिक अभ्यास केला जात आहे.

यामध्ये डेक्‍सामेथासोन या औषधाचा अत्यंत अल्प प्रमाणातील डोस दिला गेलेल्या रुग्णांचाही समावेश आहे. या तपासणीमध्ये ब्रिटनमधील 175 रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या एकूण 11,500 रुग्णांची पहाणी केली गेली. ऑक्‍सफर्ड विद्यापिठाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

एकूण 2,104 रुग्णांना डेक्‍सामेथासोनचा 6 मिलीग्रॅमचा डोस 10 दिवसांसाठी दिवसातून एकदा दिला गेला. त्यानंतर त्या रुग्णांच्या प्रकृतीतील सुधारणेची तुलना 4,321 रुग्णांबरोबर केली गेली. सर्वसाधारण उपचार घेतलेल्या रुग्णांमध्ये मृत्यूदर अधिक असल्याचे दिसले. यातील 41 टक्के रुग्णांना व्हेंटिलेटर, 25 टक्के रुग्णांना ऑक्‍सिजनची गरज भासली आणि 13 टक्के रुग्णांना कृत्रिम श्‍वसनासाठी कोणत्याही यंत्रणेची गरज भासली नाही.

डेक्‍सामेथासोनच्या वापरामुळे व्हेंटिलेटरवर ठेवलेल्यांपैकी एक तृतीयांश रुग्णांचे आणि ऑक्‍सिजन घ्यावा लागलेल्या रुग्णांचे प्राण वाचले, असे शास्त्रज्ञांनी सांगितले. मात्र ज्या रुग्णांना कोणत्याही कृत्रिम श्‍वसन यंत्रणेची मदत घ्यावी लागली नाही, त्यांना डेक्‍सामेथासोनचा काहीही फायदा झाला नाही. व्हेंटिलेटरवर ठेवलेल्या 8 रुग्णांपैकी एकाचा तरी जीव डेक्‍सामेथासोनमुळे वाचल्याचे संशोधकांचा निष्कर्श आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.