पुणे : या कोविड -१९ कालावधीत लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. डॉक्टर, शासन, पोलिस दल आणि बरेच लोक अहोरात्र काम करत आहेत आणि लोकांची सेवा मनापासून करत आहेत. अभियंता ही या काळात तितकीच महत्वाची भूमिका बजावत आहे.या लॉकडाऊन दरम्यान, भविष्यातील अभियंत्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना प्रोत्साहित करण्यासाठी ‘झील अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयाच्यावतीने’ राष्ट्रीय स्तरावरील ‘झील कोवीड-१९ हॅकाथॉन’ ही स्पर्धा ५/६/२०२० ला आयोजित करण्यात आली होती. कोविड-१९ च्या उद्रेकात उद्भवलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी ही स्पर्धा घेण्यात आली.
कुसरो वाडिया महाविद्यालयातील अणुविद्युत विभागाच्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थी सोहम मेथुल याने या स्पर्धेत प्रथम पारितोषिक जिंकले. त्याने तापमान देखरेख ठेवणारा स्मार्ट बँड बनविला आणि तो उत्तम पणे सादर केला. हा स्मार्ट बँड वापरकर्त्याचे तापमान मोजतो आणि तापमान जास्त असल्यास, इशारा जवळच्या कोविड केअर सेंटरला पाठविला जातो आणि त्या वापरकर्त्याचे थेट स्थानही पाठवले जाते, जेणेकरून त्यांची टीम त्या कोविड -१९ रुग्णची चाचणी करू शकेल. त्यांच्या अभिनव कल्पनाबद्दल त्याला प्रमाणपत्र व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. प्रत्येकाने त्याच्या उत्कृष्ट कल्पनेचे कौतुक केले.
कुसरो वाडिया महाविद्यालयातील अणुविद्युत विभागाच्या प्रेषित गुजर आणि विवित्त चंद्रशेखरन त्यांनीही स्पर्धेत भाग घेतला. त्यांनी कोविड १९ मधील रोबोटिक्स विषयी आपली कल्पना सादर केली. आपल्या सर्वांना माहित आहे की कोविड -१९ मुळे बरेच डॉक्टर व परिचारिका त्रस्त आहेत. बरेच डॉक्टर आणि परिचारिका मरण पावली आहेत. रोबोटिक्स वापरुन रूग्णांवर उपचार करणे हे त्यांचे ध्येय होते. कुसरो वाडिया महाविद्यालयाचे अणुविद्युत विभागाचे विभाग प्रमुख डॉ.ए.एस.चांडक , प्रा. शुभांगी वर्मा यांनी त्यांना उत्तेजित व प्रोत्साहित केले. प्राचार्य वी.आर.राव यांनी त्यांचे अभिनंदन केले. घरी रहा सुरक्षित रहा.
– श्रेया अंबेती (कॉलेज कनेक्ट रिपोर्टर) कुसरो वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी , पुणे.