नवी दिल्ली: दिल्लीत कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे दिल्लीत पुन्हा लॉकडाऊन होणार अशी चर्चा सुरु होती. मात्र मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. दरम्यान केजरीवाल यांनी ट्वीट केले की, बरेच लोक पुन्हा दिल्लीमध्ये लॉकडाऊन होणार का? असा प्रश्न करत आहेत. मात्र दिल्लीत लॉकडाऊन करण्याची कुठलीही योजना नाही.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, लेफ्टनंट गव्हर्नर अनिल बैजल आणि तीन महापौरांसह कोविड -१९ ची परिस्थिती हाताळण्याच्या रणनीतीवर चर्चा केली.
रविवारी दिल्लीत कोविड -१९ मधील सर्वाधिक २,२२४ नवीन रुग्ण आढळले. त्यानंतर राष्ट्रीय राजधानीत संक्रमितांची संख्या ४१,००० च्या वर गेली आणि मृतांचा आकडा १३२७ पर्यंत पोहोचला.
केजरीवाल यांच्या अगोदर दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्यंदर जैन यांनीही लॉकडाऊन दिल्लीत वाढविण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तथापि कोरोना नष्ट करण्यासाठी इतर सर्व पावले उचलली जातील. त्याअंतर्गत, चाचणी वाढविण्यासाठी डॉक्टरांपासून ते बेडपर्यंत आणि ऑक्सिजन-व्हेंटिलेटरची व्यवस्था करण्यावर भर दिला जाईल.