बेल्हे (प्रतिनिधी ):- राजुरी (ता.जुन्नर) येथील एक रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून तालुक्यातील रुग्ण संख्या ३३ वर पोहचली आहे.या मुळे सध्या तालुक्यात ऍक्टिव्ह रुग्ण संख्या १० झाली असल्याची माहिती जुन्नर चे तहसीलदार हनुमंत कोळेकर यांनी दिली.
सदर व्यक्तीला ७ जूनला विलीगिकरण कक्षात दाखल केले होते. त्रास होऊ लागल्याने ९ जून रोजी स्वब तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आला होता.तेव्हा सदर रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता.त्रास कमी होत नसल्याने दोन दिवसांपूर्वी पुन्हा स्वब टेस्ट करण्यात आले.त्याचा रिपोर्ट आज (दि.१४) रोजी पॉझिटिव्ह आला आहे.सदर व्यक्ती पुणे येथे उपचार घेत आहे.