पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व मंदिरे भाविकांसाठी बंद आहेत. याच संधीचा फायदा चोरटयांनी घेतला आहे. शहरातील बुधवार पेठेतील पासोड्या विठोबा मंदिरातील दानपेट्यावर चोरटयांनी डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
बुधवार पेठेतील पासोड्या विठोबा मंदिरात रात्री दरवाजा तोडून पहिल्या मजल्यावरून घुसून चोरी झाली आहे. यात मंदिराच्या दानपेट्या फोडून चोरटयांनी त्यातला ऐवज लंपास केला आहे. सकाळी पुजेला गुरूजी आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. घटनास्थळी पोलिस आले असून चौकशी करत आहेत.