पुणे : जगदगुरु संत तुकारम महाराज आणि माऊली संत ज्ञानेश्र्वर महाराज यांच्या पालखीचे देहू आणि आळंदी येथून होणारे प्रस्थान आणि त्यानंतर त्या पालख्यांचे पुण्यातील आगमन आणि मुक्काम हा आनंदी सोहळा दरवर्षी पुणेकर अनुभवत असतात. त्या भक्ती रसात न्हाऊन निघत असतात.
परंतू यंदा हा सोहळा करोनाच्या चक्रव्युवाहात अडकल्याने सर्वच पुणेकरांना या आनंद सोहळ्याला मुकावे लागत आहे. पुणेकर आणि पालखी सोहळा याचे अद्वैत असून पुणेकर भाविक दरवर्षी या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत असतात. करोनाचा पुण्यातील वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता यंदा पालखी सोहळा साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे.
या पालख्यांच्या पुण्यातील स्वागताची अनेक संस्थांची दीर्घकालीन परंपरा अाहे. त्याच पंरपरेला स्मरुन संवाद पुणे आणि समर्थ युवा फाैऊडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार बालगंधर्व चाैकात राणी लक्ष्मीबाई पुतळ्या जवळ संत तुकाराम गाथा आणि ज्ञानेश्र्वरी ग्रंथाचे पूजन पालखी सोहळा आणि संतांच्या कार्याला प्रतिकात्मक अभिवादन करण्यात आले