बेल्हे : नळवणे (ता. जुन्नर) येथे एक तरुण मुंबईवरून एक ते दीड महिन्यापूर्वी आपल्या नळवणे या मूळ गावी आला होता. गावात आल्यावर त्याचे विलीगिकरण करण्यात आले होते. सोमवार (दि.८) रोजी सकाळी त्याच्या अचानक छातीत दुखायला लागल्याने त्याला आणे येथे खासगी दवाखान्यात दाखवण्यात आले.
रात्री त्याला पुन्हा त्रास वाढल्याने त्याला अस्वस्थ वाटू लागले. आळेफाटा येथे सोमवार (दि.८) रोजी दवाखान्यात नेत असताना मधेच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या तरुणांच्या छाती दुखणे व दमा असल्याची लक्षणे असल्याने करोना संशयित म्हणून त्याच्या संपर्कात आलेल्या घरातील व्यक्ती तसेच नातेवाईक ५ पुरुष व ६ स्त्रिया अशा ११ जणांना मंगळवार दि.(९) रोजी प्रशासनाने कोरोनाच्या टेस्टसाठी लेण्याद्री येथे पाठवण्यात आले होते. त्या सर्वांचा रिपोर्ट गुरुवार (दि.११) रोजी सकाळी निगेटिव्ह आला आहे. अशी माहिती नवळणे गावचे तलाठी विजय साळवे यांनी दिली.