सातारा(प्रतिनिधी) – जिल्ह्यातील ३२ जणांचे करोना रिपोर्ट शुक्रवारी पाँझिटिव्ह आले. संध्याकाळी ८ तर रात्री उशिरा २४ रुग्ण निष्पन्न झाले. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाग्रस्तांची संख्या ४८४ वर पोहचली आहे. रात्री उशिरा जिल्ह्यातील विविध करोना केअर सेंटर आणि उपजिल्हा रुग्णालयातील संशयित म्हणून दाखल असलेल्या २४ जणांचे रिपोर्ट करोना पॉझिटिव्ह आले आहेत.
फलटण तालुक्यातील होळ येथील ८५ वर्षीय वृध्द महिला ‘सारी’ ने आजारी होती. काल दि. 28 मे रोजी तिचा मृत्यू झाला होता. मृत्यूपूर्वी तिच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी घेण्यात आले होते. तपासणीमध्ये तिचा रिपोर्ट करोना पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली.
या 24 बाधित रुग्णांची तालुकानिहाय गावे आणि संख्या पुढीलप्रमाणे..
फलटण तालुका : वडले येथील १, जोरगाव येथील १, होळ येथील १ (मृत वृध्द महिला), साखरवाडी येथील १.
माण तालुका : म्हसवड येथील १, दहीवडी येथील १, राणंद येथील १.
पाटण तालुका : नवारस्ता येथील १, जांभेकरवाडी (मरळोशी) येथील २, आडदेव येथील १.
खटाव तालुका : अंभेरी येथील ५, निमसोड येथील १, कलेढोण येथील २.
सातारा तालुका : निगुडमळा (ग्रामपंचायत परळी) येथील १,
वाई तालुका : मुंगसेवाडी येथील २.
जावळी तालुका : आंबेघर येथील २
आतापर्यंत सातारा जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या 484 इतकी झाली आहे.