मंचर – निरगुडसर गाव येथे करोनाबाधित रुग्ण आढळल्याने खबरदारीची उपाययोजना म्हणून मेंगडेवाडी गाव सोमवार (दि. 25) ते बुधवार (दि. 27) पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे, असा निर्णय निवडक ग्रामस्थांच्या बैठकीमध्ये घेण्यात आला.
मेंगडेवाडीत अत्यावश्यक सेवा (दूध, पेट्रोल, पाणी) वगळता पूर्णपणे बंद राहील. बाहेरगावारून मेंगडेवाडीत आलेल्या नागरिकांनी घरात क्वारंटाइन राहावे. ज्यांची घर स्वतंत्र राहण्याची व्यवस्था नसेल त्यांची सोय प्राथमिक शाळेमध्ये करण्यात आलेली आहे.
बाहेर फिरताना दिसल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, तसेच पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात येईल. गावात जनता कर्फ्यू असल्यामुळे कुणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.