सोमेश्वरनगर (वार्ताहर) – बारामती तालुक्यातील मुर्टी या गावातील एक व्यक्ती करोना पॉझिटिव्ह आढळल्याने तालुक्यात करोनाबाधितांची संख्या 11वर पोहोचली आहे. तालुक्यातील मुर्टी येथील एक व्यक्ती कामानिमित्त मुंबई येथे राहात होती.
मंगळवार (दि. 12) ही व्यक्ती त्याच्या मूळगावी मुर्टी येथे कुटुंबासमवेत दाखल झाली. मागील काही दिवसांपूर्वी त्यांना त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांची करोना चाचणी करण्यात आली. रविवारी (दि. 17) उशिरा त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे बारामती तालुक्यातील ग्रामीण भागात करोनाचा शिरकाव झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण झाले आहे.
बारामती तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये करोनाने पुन्हा खाते उघडले आहे. या व्यक्तीस उपचारासाठी बारामतीला हलवण्यात आले आहे. दरम्यान मुर्टी गावात प्रशासनाने खबरदारीची पावले उचचली आहेत.