येळसे येथील ग्रामस्थांची आग्रही मागणी
पवनानगर – येळसे ग्रामपंचायत हद्दीतील प्राथमिक आरोग्य केंद्रसाठी बांधण्यात आलेले कार्यालयाच्या जुन्या इमारतीची पडझड झाली आहे. ही जुनी इमारतीच्या भिंत कोसळली आहे. भिंत, छप्पर लाकडे, अतिशय मोडकळीस आलेल्या अवस्थेत झाली आहे. या ठिकाणी ही इमारत फार जुनी असून सध्या इमारतीचा कोणताही उपयोग केला जात नाही. शेजारीच नवीन इमारत असून त्याठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम सुरू असते.
या ठिकाणी पुनवर्सन शेवती वसाहत गावाचे गणेश मंदिर असून, या परिसरात खेळणाऱ्या लहान मुलांना वृद्धांना येथून जात असतात. या कार्यालयाच्या (पडझड झालेल्या भिंती) भिंती कधीही कोसळू शकतात. तर काही भाग हा कोसळला आहे. यामुळे याठिकाणी मोठा अपघात घडू शकतो, यामुळे नागरिकांच्या जिवितास धोका निर्माण झाला आहे. ही इमारत येळसे ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेने ताबडतोब जमीनदोस्त करावी, या ठिकाणी मोकाट जनावरे, प्राणी यांचा उपद्रव वाढला आहे. परिसरात राहणाऱ्या ग्रामस्थांच्या जिवितास धोका आहे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
यासाठी पुणे जिल्हा परिषदेने ही इमारत जमीनदोस्त करावी. यासाठी गावातील ग्रामस्थांनी अनेक वेळा तक्रार केली आहे. त्यावर कोणत्याही प्रकारची उपाययोजना केली जात नाही, अशी तक्रार नागरिक करीत आहेत.