पुणे- पुण्यात दिवसेंदिवस कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होतो आहे. त्यात आज दिवसभरात 106 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे तर दिवसभरात 5 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
दिलासादायक बाब म्हणजे गेल्या 24 तासात 144 रुग्ण कोरोनामुक्त होवून त्यांना डिस्चार्ज दिला आहे. त्यामुळे पुण्याचा कोरोनाबाधितांचा आकडा 3093 झाला आहे. 132 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात33 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
त्यातील डॉ. नायडू हॉस्पिटल आणि खासगी हॉस्पिटल मध्ये 2759 आणि ससून 334 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 1289 आहे.
दरम्यान, 1652 नमुन्यांची तपासणी आज दिवसभरात केली आहे. आतापर्यंत पुण्यात 1630 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर 174 जणांचा मृत्यू झाला आहे.