ओस्लो (नॉर्वे) – नॉर्वेचा अव्वल बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसन याने जागतिक स्तरावर एका अनोख्या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन केले होते. करोनाचा धोका असल्याने प्रत्यक्ष समोरासमोर खेळू शकत नसल्याने कार्लसनने ही स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने आयोजित केली होती. या स्पर्धेत स्वतः कार्लसनच विजेता ठरला.
कार्लसन गेल्या काही दिवसांत जगभरातील इच्छुक बुद्धिबळपटूंना या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करत होता. त्याला प्रतिसादही चांगला लाभला. उपांत्य फेरीत त्याने दिंग लिरेनचा अत्यंत अटीतटीच्या लढतीत पराभव केला व अंतिम फेरी गाठली. या फेरीत त्याची लढत अमेरिकेच्या इकारू नाकामुरा याच्याशी झाली. त्याने अत्यंत नियोजनबद्ध चाली रचल्या व हा सामना आणि विजेतेपद पटकावले. कार्लसनने नाकामुराचा 2.5 विरुद्ध 1.5 अशा फरकाने पराभव केला.