फलटण -अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून नेल्याची घटना फलटण तालुक्यातील कुरवली बुद्रुक येथे घडली. याप्रकरणी गावातीलच अनिल उर्फ कुंडलिक सतीश माळवदकर या युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी, कुरवली बुद्रुक येथील अनिल उर्फ कुंडलिक माळवदकर याने गावातीलच एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून नेले. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी तक्रार दाखल केली आहे.