परभणी : कोरोनामुळे निर्माण झालेल्या आपात्कालीन परिस्थितीत प्रशासन प्रत्येक नागरिकापर्यंत अन्नधान्य पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. त्यातच शासनाकडून येत असलेल्या राशन धान्याचा पुरवठाही वेळेवर होत. मात्र या राशन धान्यावर डल्ला मारण्यासाठी काही जण काम करत असल्याचे उघड झाले आहे.
परभणीतील एका नगरसेवकाच्या पुत्राने तहसीलमध्ये बसून एका दिवसात तब्बल 700 बोगस शिधापत्रिका तयार करुन घेतल्या. एवढेच नाही तर त्याने या तयार केलेल्या शिधा पत्रिकांवर धान्य वाटप केल्याचा आरोप होत आहे. भाजपचे आमदार संजय जाधव यांनी हा आरोप केला आहे.
खासदार संजय जाधव यांनी या प्रकरणी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे तहसीलदारांच्या निलंबनाची मागणी केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी या प्रकरणाची चौकशी करुन तात्काळ कारवाई करण्यात येईल, अशी माहिती एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना दिली.