सध्या लॉकडाउनमुळे अभिनेता सलमान खान पनवेल येथील फार्महाउसवर अडकला आहे. त्याच्यासोबत त्याची बहीण अर्पिता, आयुष शर्मा, भाचा आहिल, अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस, लूलिया वंतूर देखील आहे. तर सलमान खानची आई सलमा खान आणि वडील सलीम खान हे मात्र फार्महाऊसवर गेलेले नाहीत. ते सध्या वांद्रे येथील घरीच आहेत. पण सध्या सलमान फार्महाऊसवर कुटुंबीय आणि मित्रपरिवारासोबत वेळ घालवताना दिसत आहे.
अशातच सलमानचा जॅकलिनला डान्स शिकवतानाचा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओत “चलती है क्या 9 से 12′ या गाण्यावर सलमान डान्स करताना दिसत आहे. तसेच त्याच्यासोबत जॅकलिन देखील थिरकताना दिसत आहे. जॅकलिनला “टन टना टन टन टन तारा’वर सलमान स्टेप्स शिकवत असल्याचे दिसत आहे.
हा व्हिडीओ जुना असून “जुडवा 2′ या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळचा आहे. यात सलमान आणि जॅकलिनचा अंदाज पाहण्यासारखा आहे. सध्या सोशल मीडियावर थ्रोबॅक व्हिडिओ शेअर करण्याचा ट्रेंड सुरु आहे. हा व्हिडीओ वूंपलाने इंन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. या व्हिडिओला लाखोंच्या संख्येने लाईकस् मिळत आहेत.