न्यूयॉर्क : करोनाने अमेरिकेत थैमान घातलं असून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र अर्थव्यवस्था सुरक्षित आणि टप्याटप्याने सुरु करणार असल्याचे सांगितले आहे. करोनामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी करोनावरील लस शोधण्याच्या अगदी जवळ असल्याची माहिती दिली आहे.
आम्ही लसची चाचणी करण्याच्या अगदी जवळ आहोत. जेव्हा चाचणी सुरु होते तेव्हा त्यासाठी बराच वेळ लागतो. पण आम्ही हे लवकरच पूर्ण करु, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले आहे. डोनाल्ड ट्रम्प व्हाइट हाऊसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी उपराष्ट्राध्यक्ष माइक पेन्स आणि व्हाइट हाऊसचे करोना व्हायरस टास्क फोर्सचे समन्वयक डेबोरा बीरेक्सही उपस्थित होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी सांगितलं की, अमेरिका, जर्मनी, युके आणि चीनमधील लस लक्ष ठेवल्यानंतर आम्ही एका लसीच्या जवळ पोहोचलो आहोत.
लस शोधून त्यावर काम करण्यासाठी आमच्याकडे अनेक हुशार लोक आहेत. पण दुर्दैवाने आम्ही अद्याप चाचणीच्या अगदी जवळ पोहोचलेलो नाही. कारण जेव्हा चाचणी सुरु होईल तेव्हा त्यासाठी वेळ लागतो. पण आम्ही ते पूर्ण करु असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.