पिंपरी – महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात करोनाबाधित रुग्णांवर तुटपुंज्या पगारावर अनेक हंगामी डॉक्टर व परिचारिका जीव धोक्यात घालून उपचार करीत आहेत. प्रशासनाने या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांची जबाबदारी म्हणून त्यांना कायमस्वरूपी सेवेत घ्यावे, अशी मागणी नगरसेवक तुषार कामठे यांनी केली आहे.
आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, करोनाबाधित रुग्णांचा उपचार वायसीएम रुग्णालयात केला जात आहे. अनेक हंगामी डॉक्टर व परिचारिका जीव धोक्यात घालून तुटपुंज्या पगारावर काम करीत आहेत. महापालिका प्रशासनाने त्यांना कायमस्वरूपी सेवेत घ्यावे.