नवी दिल्ली : केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी आज माध्यमिक शाळांसाठी आज पर्यायी शैक्षणिक दिनदर्शिका जारी केली. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी घरून शिकत आहेत, हे लक्षात घेऊन सध्या ही दिनदर्शिका चार आठवड्यांकरता तयार केली आहे.
गरज भासली, तर पुढल्या काळासाठीही अशाच प्रकारच्या शैक्षणिक पद्धतीचा अवलंब करता येईल असं या दिनदर्शिकेत नमूद केलं आहे. इंग्रजी, हिंदी, ऊर्दू, गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल यासारख्या विषयांचे मार्गदर्शन या दिनदर्शिकेत करण्यात आले आहे. याशिवाय सध्याच्या परिस्थितीत ताणतणाव आणि निराशेचा सामना कसा करावा याविषयीही माहिती देण्यात आली आहे.