नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. त्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकाने केलेल्या उपाय योजनांचे कौतुक केले आहे.
Bill Gates writes to Prime Minister Narendra Modi: …expanding focused testing to identify hot spots for isolation, quarantining, and care, and significantly increasing health expenditures to strengthen the health system response and promote R&D and digital innovation.
— ANI (@ANI) April 22, 2020
कोरोना हॉटस्पॉट ओळखून लॉकडाउनसारख्या सरकारच्या कृतींचे गेट्स यांनी कौतुक केले आहे. बिल गेट्स म्हणाले कि भारत सरकार डिजिटल क्षमतांचा पूर्णपणे वापर करीत आहे. मला आनंद आहे कि, भारत सरकारने लोकांना आरोग्य सेवांशी जोडण्यासाठी आरोग्य सेतु डिजिटल अॅप सुरू केले.
बिल गेट्स यांनी आपल्या पत्रात लिहले आहे कि, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारच्या कृतिशील उपक्रमाचे कौतुक करतो. देशातील हॉस्पॉट चिन्हांकित करण्यासाठी, लॉकडाउन, क्वारंटाईन करण्यासोबतच कोरोना विरुद्ध लढण्यासाठी आवश्यक असलेल्या आरोग्याच्या पायाभूत सुविधांना वाढविणे कौतुकास्पद आहे. आपण संशोधन आणि विकासासह डिजिटल नवनिर्मितीवर खूप जोर दिला आहे. असं त्यांनी मोदींना लिहलेल्या पत्रात म्हटलं आहे.