ख्रिश्चन मिशेल यांची अंतरिम जामीन याचिका फेटाळली

नवी दिल्ली : अगस्टा वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणी अटकेत असलेले ख्रिश्चन मिशेल यांची अंतरिम जामीन याचिका सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळली आहे. तुरुंगात कैद असलेलले ख्रिश्चन मिशेल कोरोनाव्हायरसच्या भीतीपोटी अंतरिम जामीन मिळवण्याचे प्रयत्न करीत आहे. न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती बीआर गवई यांच्या खंडपीठाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आरोपी ख्रिश्चन मिशेल यांच्या याचिकेवर सुनावणी केली.

कोर्टाने ख्रिश्चन मिशेल याचिका फेटाळत म्हटले आहे कि, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सरकारने स्थापन केलेल्या उच्चधिकार समितीच्या आधारे जामीन मंजूर करता येणार नाही. मिशेल यांचे वकील अल्झो के. जोसेफ म्हणाले की, आरोपीचे वय आणि तुरूंगात अधिक आरोपी असल्यामुळे मिशेल यांना कोरोनाचे संक्रमण होऊ शकते. दिल्ली उच्च न्यायालयाच्या 7 एप्रिलच्या आदेशाविरूद्ध मिशेल यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर मिशेल म्हणाले. खंडपीठाने माझी याचिका फेटाळून लावली आहे. न्यालयाने मला सांगितले कि, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाच्या अधिकार समितीने ठरवून  दिलेल्या नियमाप्रमाणे विदेशी कैद्यांना जामीन येणार नाही.

दरम्यान, ख्रिश्चन मिशेल यांचे दुबईमधून भरततात प्रत्यार्पण करण्यात आले होते. अमलबजावणी संचालनालयाने मिशेल यांना २२ डिसेंबर २०१८ रोजी अटक केली होती. या प्रकरणात कोर्टाने मिशेल यांना गेल्या वर्षी 5 जानेवारीला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. `

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.