मुंबई : राज्यातील करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. गुरुवारी दुपारपर्यंत आणखी १६५ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून आता महाराष्ट्रातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३ हजारांच्या पुढे गेली आहे. दुपारी दीड वाजेपर्यंत महाराष्ट्रातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३ हजार ८१ झाली आहे.
165 more #COVID19 cases (including 107 in Mumbai) reported in Maharashtra today, taking the total number of coronavirus cases in the state to 3081: State Health Department pic.twitter.com/a1xpyzfyrX
— ANI (@ANI) April 16, 2020
राज्यातील ११ जिल्हे करोनाचे हॉटस्पॉट बनले आहेत. शिवाय ३ जिल्ह्यांतील काही भाग हे करोनाचे हॉटस्पॉट बनले आहेत. लॉकडाउननंतरही अद्याप राज्यातील करोना रुग्णांच्या संख्येतील वाढ थांबत नाही, ही चिंतेची बाब मानली जात आहे. बुधवारी महाराष्ट्रात करोनाची लागण होऊन ९ मृत्यू झाले होते. शिवाय बुधवारी एकाच दिवशी २३२ रुग्ण करोना पॉझिटिव्ह आढळले होते. गुरुवारी त्यात आणखी १६५ जणांची भर पडली आहे.