रांजणगाव गणपती (वार्ताहर) – रांजणगाव औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीच्या ठेकेदाराने लॉकडाऊन काळात माथाडी कामगारांची वाहतूक करत जमावबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी एक टेम्पो ताब्यात घेतला असुन ठेकेदारावर गुन्हा दाखल केला आहे.
येथील ब्रिटानिया कंपनी गेटच्या बाहेर जवळपास 25 पेक्षा जास्त मुलांनी गर्दी केली असून या ठिकाणी कुठेही सोशल डिस्टन्सिंग पाळले गेले नसल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत म्हणाले, संबंधितावर गुन्हा दाखल केला असून टेम्पो वाहन ताब्यात घेतले आहे, असे सांगितले.