मंचर – कळंब येथील मेंढपाळ सुभाष नथु केसकर यांच्या घोडीवर बिबट्याने हल्ला करून तिला ठार केले. तसेच कळंब ग्रामपंचायतीच्या हद्दीतील शिलमळा येथे मेंढपाळ सुभाष केसकर यांचा मेंढ्यांचा तळ होता.
पहाटेच्या सुमारास घोडीवर बिबट्याने हल्ला केला. त्यात मेंढी ठार झाली. मेंढपाळाचे सुमारे 30 हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावावा. अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.