पुणे – सध्याच्या लाँक डाऊनच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा कशा प्रकारे घेता येतील याबाबत चर्चा करण्यासाठी कुलगुरू प्रा. नितीन करमळकर यांनी विद्यापीठाशी संलग्न विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, संस्थांचे संचालक, विविध अभ्यास मंडळांचे सदस्य यांच्याशी गुरूवार व शुक्रवारी “झूम”च्या माध्यमातून चर्चा केली.
या चर्चेचा उद्देश, परीक्षांबाबत विविध शक्यता समजून घेणे हा होता. याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. विद्यापीठाच्या परीक्षांबाबतचा निर्णय हा शासनाच्या निर्णयानुसारच असेल.
मात्र, या बैठकीतील चर्चेचा काही भाग काही जणांकडून रेकाँर्ड करणात आला. तो समाजमाध्यमांद्वारे प्रसारित केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नये. विद्यापीठ शासनाच्या निर्णयानुसार परीक्षांबाबत निर्णय घेईल.
यासंबंधी कुलगुरू हे कोणाच्याही फेसबुक पेजद्वारे किंवा तत्सम सोशल मीडियाद्वारे संवाद साधणार नाहीत. यासंबंधीचा निर्णय विद्यापीठाच्या अधिकृत निवेदनाद्वारेच जाहीर केला जाईल.