बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणावतची बहीण रंगोली ही त्या व्यक्तींपैकी आहे, जे सोशल मीडियावर कोणत्याही मुद्द्यावर थेट टीका करतात. मग ती चित्रपटसृष्टी, राजकारण, देशांतर्गत किंवा कंगनाशी संबंधित असो. रंगोली ही ट्विटरवर आपले विचार खुप कटू शब्दांत मांडत असते; परंतु रंगोलीने काही दिवसांपूर्वी काही वादग्रस्त पोस्ट केल्याने ट्विटरने तिला थेट अकाऊंट बंद करण्याची चेतावनी दिली आहे.
रंगोलीने ट्विटरवर राष्ट्रविरोधी असल्याचा आरोप केला होता. रंगोलीने लिहिले होते की, “हे काय, ट्विटर देशविरोधी आहे… जेव्हा मी ट्विटरवर सहभागी झाली होती, तेव्हा लोकांनी मला इंस्टावर जाण्याचा सल्ला दिला होता. जर ट्विटरने माझे खाते बंद केले तर ते त्याच स्मशानभूमीत परत जाईल जिथे ते होते. अन् जेव्हा आपला प्रामाणिक आवाज दाबला जातो तेव्हा असे होते.
रांगोलीने ट्विटरवरही जोरदार टीका केली होती. तिने लिहिले की, “ट्विटरला आमच्याकडून काय हवे आहे. आम्ही फक्त “गुड मॉर्निंग’, “किती सुंदर पहाट आहे, चला चहा पिऊ या…’ असे म्हणावे. या सर्व अनावश्यक बाबींसाठी कोणाकडे वेळ आहे.मात्र, रंगोली ट्विटरवर दुसऱ्या पर्यायाबद्दलही बोलली आहे. तिने लिहिले आहे की, जर ट्विटरने तिचे खाते बंद केले तर ती स्वत:चे यू-ट्युब चॅनेल उघडेल.