पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम आणि भोसरी रुग्णालयात गुरुवारी 40 संशयितांना दाखल केले होते. त्यापैकी 36जणांचे अहवाल प्राप्त झाले असून ते निगेटिव्ह आहेत. या 40 जणांमध्ये दिल्लीहून आलेल्या एकाच आणि रुग्णांच्या हाय रिस्क कॉन्टॅक्ट मध्ये आलेल्या सहा जणांचा समावेश आहे. या सहा जणांचे तपासणी अहवाल प्रलंबित आहेत.
करोना संशयित असलेल्या 40 जणांना गुरुवारी रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्या घशातील द्राव तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठविण्यात आले होते. त्यापैकी 34 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून ते निगेटिव्ह आहेत. तर सहा जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.
दरम्यान पिंपरी चिंचवड शहरातील पहिल्या बारा रुग्णांपैकी अकरा रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. पहिला एक आणि दिल्लीहून आलेले दोन असे तीन रुग्ण सध्या महापालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे.